अरे बापरे! भादोलेत सापडला 8 फुटी अजगर

large python of eight to nine feet found on Latwade Road in Bhadole
large python of eight to nine feet found on Latwade Road in Bhadole

पेठवडगाव (कोल्हापूर) : भादोले(ता.हातकणंगले)येथील लाटवडे रोडवर आठ ते नऊ फुटाचा भला मोठा अजगर सापडला.सर्पमित्र बाजीराव कमलाकर यांनी त्याला पकडून तो वनअधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला.येवढा भला मोठा अजगर या परिसरात पहिल्यांदा सापडला असुन जंगलात अढळणारा हा अजगर कसा काय या परिसरात आला याचे कोडे उलघडणे गरजेचे आहे.


भादोलेतील सर्पमित्र बाजीराव कमलाकर व गणेश कोळी दोघे मित्र लाटवडे गावास गेले होते. रात्री दहाच्या सुमारास भादोले गावाकडे येत होते. यादरम्यान घाटगे विहीरीजवळ अचानक रस्त्यात अजगर रस्ता ओलांडताना त्यांना दिसला.त्याला बघितल्यानंतर त्यांनी ताबोडतोब मोटरसायकल बाजुला लावुन पळत जावुन त्याची शेपुट पकडून त्याला बाहेर काढले.त्यानंतर त्याला पकडुन एका पोत्यात घातले.त्यानंतर भादोले गावात जावुन सरपंच आनंदा कोळी यांना कळवले.त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची सुचना दिली.त्यानंतर रेस्कु टीमचे प्रदिप सुतार घटनास्थळी येवुन त्यांनी या अजगरास ताब्यात घेवुन कोल्हापुर ऑफिसला जमा केले.या अजगराची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला नैसर्गीक अधिवासात सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गेल्या काही वर्षापासुन या परिसरात गवा,मगर,अजगर सापडत आहेत.यापुर्वी गवा तीन वेळा आलेला होता.चांदोली अभयारण्य क्षेत्रातुन नदीचे पत्र येत असल्यामुळे या जंगलातील भरकटलेले प्राणी नदीच्या काढाने या परिसरात पोचतात असा आंदाज निसर्ग मित्रांचा आहे.


गेल्या एक महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पुर आला.याचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतातील विविध जातीचे साप गावात अश्रयास येत आहेत.गेल्या एक महिन्यात घोणस,मन्यार,नाग,धामन,अजगर असे पंन्नासपेक्षा अधिक पकडुन निसैर्गीक अधिवासात सोडल्याचे सर्पमित्र बाजीराव कमलाकर यांनी सांगितले.  

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com