Kolhapur Lockdown; शेवटच्या दिवशीही शुकशुकाट कायम

पोलिसांनी करडी नजर; फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू
Citizens should not believe the rumors that there will be a lockdown in kolhapur
Citizens should not believe the rumors that there will be a lockdown in kolhapur
Updated on

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी (covid-19) कडक लॉकडाऊन (lockdown) पाळण्यात आठवडा गेला. आज कडक लॉकडाऊनच्या अखेरचा दिवशी ठरावीक वेळेत पोलिसांनी (kolhapur lockdown) बंदोबस्तांची फिल्डिंग टाईटच ठेवली. त्यामुळे दुपारी बारानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. रूग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेतील मोजक्या वाहनांची अपवादात्मक वर्दळ कायम होती. उद्या सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल झाला. किराणा माल दुकाने, भाजीपाला सकाळी ७ ते ११ या वेळीत खरेदी करण्याची मुभा दिली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोल्हापूराचा कोरोनामृत्यूचा (death rate) दर सर्वाधिक आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून कोरोना लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला. पोलिसांनी शहरात येणाऱ्या सातही मार्गावर नाका बंदी करीत (police check post) येणा-जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ थंडावली. अत्यावश्यक सेवेतील लोक वगळता अन्य कोणालाही कारणाशिवाय फिरता येत नव्हते, अशात आठ दिवसपूर्ण झाले आहेत.

Citizens should not believe the rumors that there will be a lockdown in kolhapur
'खाकी'तली माणुसकी; बेशुद्ध फिरस्त्याचा वाचवला जीव

आज लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी रविवारी सकाळी कावळा नाका, शिवाजी पूल, उजळाईवाडी, फुलेवाडी नाका, रमणमळा चौक, बिंदू चौक, कळंबा, साने गुरूजी वसाहत आदी भागात पोलिस पथकांनी वाहनांची तपासणी केली. सकाळी साडे अकरानंतर भागातील तपासणी थांबवली. दुपारी बारानंतर अत्यावश्यक सेवा वगळता फारसे कोणी बाहेर पडले नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊनचा शेवटचा दिवसही शुकशुकाटात गेला.

पोलिसांबरोबर महापालिका कर्मचारीही या मोहिमेत सहभागी होते. त्यांनी मास्क न घालणाऱ्यांकडून दंड वसुली सुरू केली. चौकाचौकात महापालिका कर्मचारी थांबून होते तर दोन पथके शहरात फिरती गस्त घालत होते. गेली सात दिवस बंद असलेली कोरोना प्रतिबंधक लसीकरण आज सुरू झाली. लसचा नवा साठा आल्यामुळे महापालिका रूग्णालयात लसीकरण सुरू झाले. त्याचा आधार घेत अनेकजन लस घेण्याचे कारण सांगत फिरत होते. मात्र आज लसीकरणाचा दुसरा डोस फक्त मिळत होता, तोही मोजक्या व्यक्तींना देण्यात येणार होता. त्यामुळे लसीकरण केंद्रावर नाहक गर्दी करू नये असे आवाहन महापालिका कर्मचारी करीत होते.

Citizens should not believe the rumors that there will be a lockdown in kolhapur
केळीच्या बागेत कलिंगडचे आंतरपीक; एकरी 32 टनाचे विक्रमी उत्पन्न

येथेही होता सन्नाट

शाहू मार्केट यार्ड कडक लॉकडाऊनमुळे बंद आहे. परिणामी शेतीमालाची आवक नाही. रविवार सुट्टी दिवशी भरणारा आठवडी बाजार आजही बंद राहिला. मध्यवर्ती बसस्थानकांची दोन्ही फाटक बंदच राहीली. परिणामी एकाही बसची प्रवासी वाहतुक होऊ शकली नाही. ताराबाई पार्क रोड, बिंदू चौक, विद्यापीठ रोड राजारामपुरीसह सर्वच भागातील खाऊ गल्ल्या बंद राहील्याने शुकशुकाट होता. तर पर्यटक वाहने, रिक्षा, केएमटीबससह विक्रेत्यांच्या वर्दळीने गजबजणारे शिवाजी पुतळा, भवानी मंडप, महाव्दार रोड, रंकाळा चौपाटी आदी नेहमीच गर्दीने फुलणाऱ्या भागात आज दुपारी बारानंतर मात्र शांतता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com