
Kolhapur Crime : ‘आवाज सोडतो, काचा फोडतो’ असे जाहीर फलक दाखविण्याचे धाडस कोणामुळे आले?, असे धाडस होतेच कसे ?, ‘सगळं कसं वजनात’ ठेवण्याचे आव्हान कोणाला दिले जाते?, कारवाईसाठी पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत?, कारवाई करण्याचे धाडस जोपर्यंत पोलिसांकडून दाखविले जाणार नाही, तोपर्यंत हे सर्व उघड चालणार आहे. कारवाई करू नका, असे कोण सांगते, ते देखील कळावे. थेट कारवाई करून वर्दीचा रुबाब कायम ठेवावा. अन्यथा, भविष्यात याच वर्दीला डाग लागला तर नवल वाटणार नाही.