
इचलकरंजी : लाचप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या एका बँकेच्या कायदा सल्लागाराची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ॲड. विजय तुकाराम पाटणकर (वय ३८, रा. इचलकरंजी) याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाटणकर यांच्या वकिलाकडून न्यायालयासमोर त्याचा जामीन अर्ज सादर केला आहे. आता याप्रकरणी न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.