
संदीप खांडेकर
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी बाजारपेठेत भाजीपाला, फळ विक्रेत्यांची गर्दी. धान्य घेण्यासाठी ग्राहकांच्या दुकानांसमोर रांगा. चटणी, तांदूळ, गहू, डाळी घेऊन जाणाऱ्यांच्या चारचाकी रस्त्यावर थांबलेल्या. गर्दीतून वाट काढत दुचाकीवरून आझाद चौकाकडे जाताना अक्षरश: घाम फुटला. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्रेते बसलेले. वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव तर आलाच, शिवाय अस्वच्छतेचे चित्र प्रकर्षाने दिसले. लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजार रविवारी भरतो. त्या दिवशी होलसेल मार्केट बंद असते. रविवारी केलेल्या फेरफटक्यातून लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील समस्यांची मालिकाच समोर आली.