
कोल्हापूर : हवामान बदल, सामाजिक असमानता अशी विविध आव्हाने, समस्यांना सध्या जग तोंड देत आहे. या गुंतागुंतीच्या समस्या तुमच्यापैकी अनेकांना सोडवण्यासाठी नेतृत्व करावे लागेल. कारण, तुम्ही केवळ पदवीधर नाही; तर बदल, नावीन्य, प्रगतीचे राजदूत आहात. तुमच्यामध्ये समाधानाचा भाग आणि स्वतःसह सभोवतालच्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः बदलाचे प्रतिनिधी व्हा, असे आवाहन पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक प्रा. डॉ. आशीष लेले यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.