कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश दिल्ली येथून आल्यानंतर आज तात्काळ भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच अमित शहा यांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. यानंतर महादेवराव महाडिक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

हेही वाचा: राज्यातील सहाही विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार?

दरम्यान, राज्यातील सहा विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यासाठी काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJO) तसा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी दिला आहे. यासंदर्भात निर्णय होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी दिली होती. काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांची घोषणा झाली, तसेच काँग्रसनेही उमदेवारांच्या नावाची घोषणा केली होती. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापूर आणि नागपूरची निवडणूक बिनविरोध होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरु होती. त्यानुसार नागपूर हे भाजपच्या ताब्यात असेल, तर कोल्हापूर काँग्रेसच्या ताब्यात जाईल, अशी सूत्रांची माहिती समोर आली होती. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

loading image
go to top