
कोल्हापूर : कोरोना संचारबंदीतील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयाला आज सकाळी साडेनऊ वाजता "ताला ठोको' आंदोलन केले. प्रवेशद्वाराला ताला ठोकताना पोलिस यंत्रणा व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अन्य कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. जोपर्यंत कार्यकर्त्यांची सुटका होणार नाही, तोपर्यंत प्रवेशद्वारापासून हटणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. पोलिस यंत्रणेला ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडावे लागले.
घरगुती वीज बिले माफ करावीत, यासाठी समितीतर्फे यापूर्वी आंदोलने केली. त्याची दखल घेतली गेली नाही. सरकारला पुन्हा जागे करण्याच्या उद्देशाने समितीने ताला ठोको आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार समितीचे कार्यकर्ते सकाळीच महावितरणच्या प्रवेशद्वारासमोर आले. त्यांनी प्रवेशद्वाराला ताला ठोकून आंदोलनाला सुरुवात केली. भरणार नाही भरणार नाही वीज बिले भरणार नाही, वीज बिले माफ झालीच पाहिजेत, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
श्री. होगाडे म्हणाले, "कोरोनाने कामगारांचा रोजगार हिरावला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन कमी झाले आहे. वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज बिल माफीची रक्कम नगण्य आहे. सरकारने ती भरून ग्राहकांवरील बिलाचे ओझे कमी करावे. दिवाळीपूर्वी त्याबाबतचा निर्णय घ्यावा. अन्यथा पुढील आंदोलनाची तयारी करावी लागेल.'
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले, "सामान्य ग्राहकांची आर्थिक व्यवस्था बिघडली आहे. जनतेला कोरोनाची झळ पोचली आहे. बिल माफ करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत.' नामदेव गावडे म्हणाले, "शेतकरी वर्ग संकटाला सामोरा जाणारा आहे. मोदी सरकारने मात्र शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे.' बाबा इंदुलकर यांनी शहरात रोज दहापेक्षा जास्त गुन्हे घडत असताना महावितरणसमोर पोलिसांचे कवायत ग्राऊंड आहे का?
विक्रांत पाटील-किणीकर, प्रा. जालंदर पाटील, सुभाष जाधव, दिलीप देसाई, संदीप देसाई, बाबा पार्टे, प्राचार्य टी. एस. पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, जावेद मोमीन, संभाजीराव जगदाळे, जयकुमार शिंदे, हर्षद पाटील, सखाराम पाटील, बाळासाहेब भोसले, संपदा मुळेकर, लहूजी शिंदे, नीता पडळकर, महादेव धनवडे, तकदीर कांबळे सहभागी झाले.
प्रवेशद्वारावर ठिय्या; कर्मचाऱ्यांची पंचाईत
प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. हॉटेल वुडलॅंडच्या बाजूने असलेल्या छोट्या वाटेने कार्यालयात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याची माहिती कळताच कार्यकर्त्यांनी ही वाट अडवली. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना येथून जाण्यास सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.