
...तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे
कोल्हापूर : कचरा घोटाळा प्रकरणी सर्व पुरावे देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीसही दिलेली नाही. पुढील दोन दिवसात नोटीस दिली नाही तर गुरुवारी (ता.२६) प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला भाजपचे कार्यकर्ते टाळे ठोकतील, असा इशारा पक्षाने पत्रक काढून दिला आहे.
हेही वाचा: स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी आपण जातव्यवस्थेच्या कचाट्यातच: हायकोर्ट
पत्रकातील माहितीनुसार, भाजपाच्या कसबा बावड्यातील कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसापूर्वी महापालिकेत वर्षानुवर्षे साचलेला लाखो टन कचरा कोणतीही प्रक्रिया न करता येथील शेतात टाकल्याचे उघडकीस आणले होते. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड ऑफिसर अर्जुन जाधव यांनी प्रत्यक्ष जागेवर फिरती करून पंचनामा केला. त्यात ‘या ठिकाणी महापालिकेने अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न करता कचरा टाकल्याचे दिसून आले असल्याचा असा स्पष्ट उल्लेख केला आहे. असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेवर कोणतीच कारवाई केलेली नाही. याबाबत साधी नोटीसही दिलेली नाही, असे पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Lock The Pollution Control Board
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..