esakal | जनावरे बाजार बंदमुळे 2 कोटींचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरे बाजार बंदमुळे 2 कोटींचा फटका

जनावरे बाजार बंदमुळे 2 कोटींचा फटका

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : कोरोना लॉकडाउनमध्ये (lockdown effect) जीवनावश्यक बाबी तसेच शेतीशी निगडित व्यवहारांना सवलत दिली असली तरी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील जनावरे बाजारांबाबत कोणताही ठोस निर्णय सांगितलेला नाही. वर्षभरापासून बाजार समितीचे जिल्ह्यातील (kolhapur district) तीन जनावरे बाजार बंद आहेत. यात पेठवडगाव, मलकापूर आणि कोल्हापूर बाजार समितीच्या बाजारांचा समावेश आहे. यातून ३० कोटींच्या उलाढालीला खीळ बसली. बाजार समित्यांचे दोन कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. बाजार समितीचा आर्थिक कणाच कमकुवत झाल्याने खर्च भागवावा कसा, असा प्रश्न पेठवडगाव व मलकापूर बाजार समितीपुढे आहे.

सव्वा वर्षापासून जनावरे बाजारातील व्यवहारांवर उपजीविका असलेले शेतकरी, शेतमजूर तसेच जनावरे खरेदी-विक्री करणारे एजंट यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोना सुरू झाल्यापासून लॉकडाउन झाले. यात शेतीशी संबंधित सर्व व्यवहार बाजार समितीत सुरू होते. मात्र, कडक निर्बंधात भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहारही बंद राहिले. यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या सूचनेनुसार मलकापूर, पेठवडगाव व कोल्हापूर बाजार समितीचे जनावरे बाजारही बंद ठेवण्यात आले.

हेही वाचा: पुढचे 4 दिवस कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर बाजार समितीने कागल येथे जनावरांसाठी उपबाजार सुरू केला, त्याचे उद्‌घाटन झाले. महामार्गालगतच्या जागेत बाजार भरणार होता, लॉकडाउन सुरू झाले आहे. पाच महिने झाले तरीही एक दिवसही बाजार येथे भरला नाही. पेठवडगाव बाजारात जवळपास ३०० ते ४०० जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात; तर मलकापूर बाजारात १५०-२०० जनावरांचे व्यवहार होतात. पावसाळ्याच्या तोंडावर अनेकदा जनावरे विक्री केली जाते; तर उन्हाळ्यात मराठवाडा, कर्नाटक सीमाभागातील जनावरे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यामुळे या दोन्ही हंगामात जनावरे बाजार उलाढाल वाढते. यातून बाजार समितीला कर मिळतो. व्यवहार घडविणाऱ्या एजंटांना कमिशन मिळते. अनेकांची उपजीविका या जनावरांवरच चालते. मात्र, यंदा कोरोना लॉकडाउनमुळे हे व्यवहार थंडावले. त्यामुळे विविध पातळ्यांवर नुकसान झाले आहे.

‘‘बाजार समित्यांनी जनावरे बाजार सुरू करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच जिल्हा सहकार निबंधकांकडे लेखी मागणी केली आहे. याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. परिणामी, बाजार भरू शकलेला नाही. जनावरे बाजाराशी सर्वच संबंधित घटकांचे अर्थकारण थांबले आहे.’’

- आनंद पाटील, सचिव, पेठवडगाव बाजार समिती

हेही वाचा: हेडफोन जॅक काम करत नाही? वापरा 'या' ट्रिक्स

loading image