ना सवलत, ना अनुदान: व्यापारी, विक्रेते कर्जाच्या खाईत

ना सवलत, ना अनुदान: व्यापारी, विक्रेते कर्जाच्या खाईत

कोल्हापूर : कोरोनामुळे (Covid 19)छोटी-मोठी दुकाने (Shops)बंद आहेत. गेल्या दीड वर्षात एप्रिल आणि मेमधील लग्नसराईचे दोन्ही हंगाम वाया गेले. त्यामुळे जिल्ह्यातील कापड, भांडी व्यापारी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह(Textiles, utensils, electronics) छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसह विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. उलाढाल नाही. पैशांचा स्रोत बंद. ना सवलत; ना अनुदान. त्यातच कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी विविध वित्तीय घटकांकडून ससेमिरा सुरू झाला. दुकान बंदमुळे मेटाकुटीला आलेला हा सारा वर्ग आता कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.lockdown impact Merchants dealers in debt kolhapur covid 19 news

कोरोनाने केवळ आरोग्याचे संकट उभे नाही, तर जिल्ह्याचे अर्थकारणही व्हेंटिलेटरवर गेले आहे. लग्नसराईचे सलग दोन हंगाम (एप्रिल आणि मे) उलाढाल ठप्प होती. याच काळात भांडी, कपडे, सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होते. कोल्ड्रींक हाउस, आइस्क्रीम पार्लर यांचाही हाच हंगाम असतो. गत वर्षीही शाळा केवळ तीन महिन्यांसाठी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गणवेश खरेदी, स्टेशनरी साहित्य यांच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार, याचा नेम नाही.

लॉकडाउन आणि नंतर कडक निर्बंध अशा उपाययोजनांमुळे मात्र सर्वच विक्रेत्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दुसरीकडे वीजबिल, घरफाळा, पाणीबिल, विविध प्रकारचे कर थांबलेले नाहीत. या व्यापारी, विक्रेत्यांनी सामाजिक भान ठेवत कामगारांना पगार दिला आहे. कर्जाचे हप्तेही सुरू आहेत. शासनाने याचा गांभीयाने विचार करण्याची अपेक्षा दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.

सलग दोन लग्नसराईचे हंगाम आणि त्याचवेळी अक्षयतृतीया, गुढीपाडवा, ईद असे उलाढालीचा महत्त्वाचा काळ यंदा व्यवसायाविना गेलेला आहे. परिणामी ३५ टक्के व्यवसाय बुडाला आहे.

- मुरली रोहिडा, कापड, रेडीमेड कपडे व्यापारी

लग्नसराईत गृहोपयोगी भांड्यांची मोठी उलाढाल होते. एकूण व्यवसायाचा ७० टक्के व्यवसाय याच काळात होतो; पण ही विक्री ठप्प आहे. यामुळे मोठे आर्थिक संकट आहे. छोट्या दुकानदारांना घर चालविणेही अवघड झाले आहे.

- नितीन वणकुंद्रे, भांडी व्यावसायिक

शासनाने परिस्थितीची दखल घेऊन या कालावधीतील घरफाळा, वीजबिल, पाणीबिल, विविध कर माफ करावेत. या काळातील कर्जांवरील व्याजही माफ करावे. असे झाले तरच पुढील कालावधीत दुकानदारांना पुन्हा उभे राहून व्यवसाय करता येईल.

- संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ कॉमर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com