esakal | विद्यार्थी संभ्रमात : ऑनलाइन शिक्षण झाले सुरु मात्र परदेशी शिक्षणाची वाट बिकट
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown impact online education gained momentum at the local level But  confusion in front of students aspiring for foreign education

विद्यार्थी-पालक चिंतेत; ऑनलाइन शिक्षण, तरी ‘फी’मध्ये नाही सवलत 

विद्यार्थी संभ्रमात : ऑनलाइन शिक्षण झाले सुरु मात्र परदेशी शिक्षणाची वाट बिकट

sakal_logo
By
आकाश खांडके

कोल्हापूर : लॉकडाउनच्या काळात स्थानिक पातळीवर ऑनलाइन शिक्षणपद्धतीने जोर धरला. पण, विदेशी शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसमोर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पुढील वर्षी ‘ऑन कॅम्पस’ शिकायचे का? ऑनलाइन कोर्स सुरू करायचा? हा प्रश्न सध्या विद्यार्थी व पालकांना पडला आहे.  शिक्षण ऑनलाईन सुरू असले तरी  ‘फी’मध्ये मात्र सवलत नाही. विदेशी विद्यापीठांचे हे दुहेरी धोरण मात्र विद्यार्थ्यांच्या पचनी पडताना दिसत नाही. 


कोरोनामुळे जगभरातील शिक्षण यंत्रणा कोलमडली आहे. सहा महिन्यापासून शिक्षणाची वाट खडतर झाली आहे. रोज शाळा, महाविद्यालये आता सुरू होणार की नंतर, यावरच चर्चा झडत आहेत. शासन स्तरावरही धोरण निश्‍चित  नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. ज्याप्रमाणे देशांतर्गत शिक्षणाबाबत अनिश्‍चितता आहे तशीच अवस्था ही विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली आहे. ॲडमिशन कन्फर्म आहे, पण देशाबाहेर जाणे शक्‍य नाही. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सर्वच विद्यापीठांनी खुला केला आहे पण हे शिक्षण किती प्रभावी ठरेल याबाबत मत-मतांतरे आहेत. 

हेही वाचा- .....म्हणून त्या गर्भवतीला आपल्या बाळासह गमवावा लागला जीव
 

याबाबत बोलताना कौन्सिलर व तज्ञ पल्लवी देसाई म्हणाल्या, ‘पदव्युत्तर पदवीचा कालावधी दोन वर्षे असतो. सध्याच्या धोरणाप्रमाणे पहिले सहा महिने ऑनलाइन पद्धतीने शिकवले जाईल. मात्र या शिक्षणाचा म्हणावा तेवढा फायदा मुलांना होणार नाही. परदेशी जाऊन शिक्षण घेतल्याने सर्वांगीण विकास होतो, शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरी करण्याचा अनुभव मिळतो, विविध देशातील विद्यार्थ्यांचा सहवास लाभतो, तिथले राहणीमान व संस्कृती कळते, या सर्व गोष्टींना महत्व आहे. बहुतांश विद्यापीठांनी ॲडमिशन पुढे ढकलण्याची मुभा सुद्धा दिली आहे. असे विद्यार्थी पुढील वर्षी ऑन कॅम्पस शिक्षण घेतील. हे सुरू असताना, जीआरई परीक्षेसाठी सुरू असलेल्या कोचिंग क्‍लासेसमध्ये  विद्यार्थ्यांचा तुटवडा नाही. पुढील वर्षी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार नाही. कोरोनाच्या संकटाचा नोकरभरतीवर परिणाम होणार आहे, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरमधून दरवर्षी शिक्षणासाठी विदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या


 अमेरिका   -     ३००
 जर्मनी       -     ७०
 कॅनडा        -   ५० ते ६०
 इतर देश     -   ५० ते ६०

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top