Hasan Mushrif : 'लोकसभा निवडणुकीत महायुतीतला एकोपा आणि सामंजस्याचा आदर्श संबंध देशाला दाखवून देऊ'

यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ‘अबकी बार -४५ पार...’ या ध्येयाने संघटितपणे काम केले पाहिजे.
Loksabha Election Hasan Mushrif Narendra Modi
Loksabha Election Hasan Mushrif Narendra Modiesakal
Summary

महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांच्यासह एकूण १५ घटक पक्ष आहेत.

कोल्हापूर : ‘महायुतीमधील एकोपा आणि सामंजस्याचा आदर्श राज्यासह संबंध देशाला दाखवून देऊया’, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. येथील महासैनिक दरबारमध्ये रविवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता महायुतीचा (Mahayuti) मेळावा होत आहे. हा मेळावा उच्चांकी करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजे, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.

Loksabha Election Hasan Mushrif Narendra Modi
Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

शासकीय विश्रामगृहात महायुतीमधील घटक पक्षांच्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) होते. मुश्रीफ म्हणाले, ‘यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ‘अबकी बार -४५ पार...’ या ध्येयाने संघटितपणे काम केले पाहिजे. महायुती सरकारने राज्यातील विकासाला गती आणि चालना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे आणि संपूर्ण देशाच्या आर्थिक उन्नतीचे फार मोठे कार्य केले आहे. हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.’

Loksabha Election Hasan Mushrif Narendra Modi
Konkan Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार दळवी करणार भाजपमध्ये प्रवेश?

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांच्यासह एकूण १५ घटक पक्ष आहेत. या सर्वच पक्षाच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागून जिल्हा पातळीवरील हा मेळावा यशस्वी केला पाहिजे.’ यावेळी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार के. पी पाटील, माजी आमदार अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, राजवर्धन नाईक- निंबाळकर, सत्यजित कदम, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

Loksabha Election Hasan Mushrif Narendra Modi
'शिंदे-फडणवीस-पवारांचं सरकार गतिमान, धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा खासदार करा'; श्रीकांत शिंदेंचं नागरिकांना आवाहन

मंदिरांची साफसफाई, रोषणाई करावी

‘मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात महायुतीचा भव्य मेळावा होत आहे. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. याचा संदर्भ घेत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘गेल्या पाचशे वर्षांपासून संबंध देश अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतीक्षेत होता. हा दिवस जवळ आलेला आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी गावागावांतील विविध देवदेवतांच्या मंदिरांची साफसफाई आणि रोषणाई करावी.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com