कोल्हापूर : कलात्मक घड्याळांतून जपले फुटबॉलप्रेम

निखिल मोरेची निर्मिती : खेळाडूंच्या नावासह जर्सी नंबर असलेल्या क्लॉकला मागणी
Football
Footballsakal

कोल्हापूर : फुटबॉलचा खेळ घड्याळाच्या काट्यावर चालतो. प्रत्येक क्षणगणिक नवीन डावपेच आणि चाली बदलाव्या लागतात. तर कुठे जाऊन सरता शेवटी अपेक्षित विजय हाती लागतो. असे हे मैदानावरचे फुटबॉल कोरोनामुळे बंद झाले आणि उरलेल्या घड्याळाने आयुष्य सावरले. फुटबॉल प्रेमाने झपाटलेल्या निखिल मोरे यांनी कलात्मक घड्याळे साकारत आपले फुटबॉलप्रेम जपले आहे. या प्रवासाची सुरुवात पहिल्या लॉकडाउनपासून झाली. निखिल उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू व डी लायसन्स कोच. एका शाळेत निमंत्रित प्रशिक्षक तसेच स्वतःची फुटबॉल ॲकॅडमी असे सर्वकाही एका कोरोनाने बंद केले.

Football
सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर; रुग्ण वाढले तरी वैद्यकीय सज्जतेत होतेय सुधारणा

जगभरात कोरोनाच्या फैलावामुळे क्रीडा क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक उद्‍भवलेल्या या परिस्थितीमुळे हातचे होते नव्हते ते सगळे गेले. या परिस्थितीतही खचून न जाता निखिलने कलेची वाट धरली. यातून त्याने आपल्या शिक्षणाचा वापर करत कलात्मकतेने फुटबॉल खेळावर आधारित घड्याळे बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भिंतीवरील घड्याळ बनवून त्याचे फोटो विविध समाजमाध्यमांवर प्रसारित केले. याची दाखल घेत अनेक फुटबॉलप्रेमींनी अशी घड्याळे बनवून देण्याची मागणी केली. यातूनच पुढे जाऊन कपल क्लॉक, बेबी क्लॉक, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कटआउट क्लॉक असे विविध आकार आणि नमुन्याचे घड्याळे निखिलने बनवली. त्याच्या या छंदाचे रूपांतर आता व्यवसायात झाले आहे. त्याने टेबल क्लॉकही बनवली आहेत. आजपर्यंत १५० हून अधिक वॉल क्लॉक तर ७५ हून अधिक टेबल क्लॉक बनवली आहेत. एक घड्याळ पूर्ण करायला सुमारे ३ तासांहून अधिक काळ लागतो. या क्लॉकला कर्नाटकमधूनही मागणी आहे.

Football
Corona Update: देशात नवे रुग्ण वाढले; केरळमध्ये कोरोनाचा कहर

लाखमोलाची भेट

कोल्हापूरच्या फुटबॉलवर प्रेम करणारे संतोष कुईंगडे यांनी आपल्या आवडत्या फुटबॉल खेळाडूंना निखिलची ही घड्याळे भेट दिली आहेत. प्रत्येक खेळाडूंच्या नावासह जर्सी नंबर असणारी ही घड्याळे या खेळाडूंसाठी लाखमोलाची ठरली आहेत.

खेळाडू कधीही खचत नाही हे मनाशी पक्के ठरवून कोरोनाच्या परिस्थितीतही स्वतःला खंबीर ठेवले. इच्छा असेल तर मार्ग मिळतोच आणि हेच मी केले. ही घड्याळे बनवणे व्यवसाय झाला असला तरीही व्यावसायिक बनण्यापेक्षा फुटबॉलप्रेमी राहणे मला पसंद आहे.

-निखिल मोरे, घड्याळ निर्माता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com