आलिशान कार चोरणारी टोळी कोल्हापुरात जेरबंद ; कर्नाटकातील तिघे अटक l Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

आलिशान कार चोरणारी टोळी कोल्हापुरात जेरबंद ; कर्नाटकातील तिघे अटक

कोल्हापूर : आलिशान मोटारीच्या नंबर प्लेट, चेस नंबर मध्ये खाडाखोड करून त्याची विक्री करणाऱ्या परराज्यातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. या प्रकरणी कर्नाटकातील (Karnataka) तिघांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून पाच कोटी रुपये किमतीच्या ३१ आलिशान मोटारी पोलिसांनी जप्त केल्या. (Kolhapur Crime News)

हेही वाचा: जिल्हा बँकेनंतर आता राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे लक्ष पालिकेवर

हे रॅकेट महाराष्ट्र-कर्नाटक, मणिपूरसह (Maharashtra Karnataka,Manipur)इतर राज्यात सक्रिय असल्याची माहिती पुढे येत आहे. जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (४२), यश प्रशांत देसाई (२६) आणि खलिद अहमद लियाकत सारवान (४०, सर्व कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top