महाविकास आघाडी दाऊदचे समर्थक; चंद्रकांत पाटील

मलिक यांचा राजिनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा
Chandrakant Patil
Chandrakant PatilChandrakant Patil
Updated on

कोल्हापूर : अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी मुंबई बाँम्बस्फोटाचा सुत्रधार दाऊन ईब्राहिम याच्याशी संबंधीत असणारी जमीन खरेदी केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असून त्यांच्यावर ईडी आणि एन.आय.ए यांनी कारवाई केली. असे असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मलिक यांचा राजिनमा घेत नाहीत. उलट अख्खे मंत्रीमंडळ मलिक यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येते. याचा अर्थ महाविकास आघाडी दाऊदचे समर्थन करते. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मलिक यांचा राजिनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, "मुंबई बाँम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊन आणि त्याचे साथिदार देश सोडून निघून गेले. मात्र आपल्या हस्तकांमार्फत तो भारतातील आपले व्यवहार चालवत होता. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास गेल्या काही वर्षांपासून एन.आय.ए करत आहे. या तपासासून दाऊनशी संबंधीत असणारी जमीन सरकारने जप्त करू नये म्हणून मंत्री नबाब मलिक यांनी पूर्वी विकत घेतली असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर एन.आय.ए आणि ईडी यांनी कारवाई केली. न्यायालयानेही प्राथमिक पुरावे ग्राह्य मानून त्यांना ३ मार्च पर्यंत कोठडी दिली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यावर तरी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार मलिक यांचा राजिनामा घेतील असे वाटले होते. मात्र त्यांनी राजिनामा घेतला नाहीच उलट ते मलिक यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. जिथे सामान्य माणूस आंदेलन करू शकत नाही. त्या मंत्रालयाच्या आतील परिसरात त्यांनी आंदेलन केले. एका अर्थाने महाविकास आघाडीचे दाऊद इब्राहिम याला समर्थन असल्याचेच दिसते. मात्र जोपर्यंत मलिकांचा राजिनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजप आंदोलन सुरूच ठेवणार. आगामी अधिवेशनात राजिनाम्याची मागणी करून ते अधिवेशन चालू देणार नाही."

राठोडांना एक न्याय...

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले," सरकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात त्याचे निलंबन होते. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजानिमाही आरोपानंतर तात्काळ घेण्यात आला. मग कॅबिनेट मंत्री असणाऱ्या नबाब मलिक यांना वेगळा न्याय का शिवसैनिकांनी याचा जाब विचारणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambabai Temple conservation work allegations
Radhanagari Dam Water Level Reaches 85%
Kolhapur auto rickshaw driver murder latest news
Sadabhau Khot Education
Marathi News Esakal
www.esakal.com