

Temple Development Stalled
sakal
गडहिंग्लज : येथील ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील मंजूर सव्वाकोटीचा निधी खर्च झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात पाच कोटींचा निधी मंजूर असला तरी, त्यातील ५० टक्के रक्कम पालिका व देवस्थान ट्रस्टीचा हिस्सा (प्रत्येकी सव्वा कोटी) आहे; परंतु दोन्ही संस्थांची ती कुवत नसल्याने शंभर टक्के निधी शासनाकडून मंजूर व्हावा, यासाठी मंजूर निधी आदेशाच्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्याप त्यावर शासन निर्णय नसल्याने मंदिराचे काम तीन महिन्यांपासून ठप्प आहे.