SSC-HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठा बदल; नापास होणाऱ्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी बोर्डाची नवी रणनीती, निकाल 100 टक्के लावण्यासाठी काय आहे मास्टरप्लॅन?

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 : तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांच्या तुलनेत लेखी परीक्षेतील कामगिरी सुधारण्यासाठी लेखन सराव, उत्तरपत्रिका विश्लेषण आणि वेळेचे नियोजन यावर भर दिला जाणार आहे.
Maharashtra SSC HSC exam new action plan 2027

Maharashtra SSC HSC exam new action plan 2027

esakal

Updated on: 

कोल्हापूर : दहावी-बारावीच्या परीक्षेत केवळ उत्तीर्णतेची टक्केवारी वाढविण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावण्यावर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर व कोकण विभागाने भर दिला (Maharashtra Board new action plan for students) आहे. फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेसाठी तयार केलेल्या कृती आराखड्यात ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, अनुत्तीर्णांची संख्या शून्यावर आणणे आणि ग्रेस गुणांवरील अवलंबित्व निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Loading content, please wait...