Court Employees in Kolhapur Protest with Black Ribbons, Demanding Equal Pay for Equal Work
esakal
कोल्हापूर: उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही ‘समान काम, समान वेतन’ मिळावे, या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयासमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. राज्यातील ३४ हजार ५०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.