Agniveer government jobs
esakal
उजळाईवाडी : अग्निवीरांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी (Agniveer reservation Maharashtra) दिली. माजी सैनिकांनी देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही अनुभवाचा उपयोग समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कणेरी (ता. करवीर) येथील कणेरीमठात अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन झाले.