Ichalkaranji Municipal Corporation Election
esakal
इचलकरंजी : मतदानाच्या (Ichalkaranji Election) पूर्वसंध्येला ‘लक्ष्मीदर्शना’वरून सुरू झालेला वाद मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत शहरातील अनेक मतदान केंद्रांवर क्षणोक्षणी पाहायला मिळाला. कुठे किरकोळ वादाचे रूपांतर झटापटीत झाले, तर अनेक ठिकाणी थेट अंगावर धावून जाणे, कानशिलात मारणे, शर्ट फाटेपर्यंत जोरदार हाणामारीच्या घटना घडल्या. एकूणच ‘लक्ष्मीदर्शन’ वादाने शहरात तणाव वाढल्याने वातावरण चांगलेच तापले.