

Leaders extend support to the protest over the Maharashtra-Karnataka border dispute at Dasara Chowk in Kolhapur.
esakal
कोल्हापूर,: ‘सीमाभागातील मराठी भाषकांना महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा असून, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात असल्याचा संदेश देण्यासाठी निपाणी किंवा कोल्हापूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार लवकरच ही बैठक घेण्यात येईल’, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी आज येथे दिले.
सीमाप्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेसाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार माने आहेत. निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दसरा चौकात झालेल्या धरणे आंदोलनात भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.