New Year Holidays : २०२६ मध्ये सुट्ट्यांची लॉटरी! महाराष्ट्रात ७४ सार्वजनिक व ९८ शासकीय सुट्ट्या; मार्च-ऑगस्ट ठरणार ‘हॉलिडे हॉटस्पॉट’
Public Holidays 2026 : २०२६ मध्ये ३६५ दिवसांपैकी ७४ सार्वजनिक सुट्ट्या; सण, जयंती आणि राष्ट्रीय दिनांचा समावेश, दुसरा व चौथा शनिवार धरून शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना ९८ सुट्ट्यांचा थेट लाभ.
मुरगूड : आगामी २०२६ या नव्या वर्षात तब्बल ७४ सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या मात्र ९८ सुट्या असणार आहेत. ऑगस्टमध्ये सर्वाधिक ११, तर जून, जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये कमी सुट्या आहेत.