
कुडित्रे : बांधावरचा शेतरस्ता आता १२ फुटांचा होणार असून, महसूल विभागाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने हा आदेश २२ मे २०२५ रोजी काढल्यानंतर शेतीतील वाद मिटविण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर ९० दिवसांत करण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.