Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Maharashtra monsoon : महाराष्ट्रात मान्सून कायम असला तरी मुसळधार पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील चार दिवसांचे हवामान, पावसाचा इशारा आणि जिल्हानिहाय अंदाज वाचा.
Maharashtra Weather rain alert

Maharashtra Weather rain alert

esakal

Updated on

Maharashtra rain forecast : कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम असून, मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी सुरू आहेत. हवामान विभागाने शनिवारी (ता. २५) रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण कायम असून तापमानातही लक्षणीय घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com