
बेळगाव - परजिल्ह्यातील स्थलांतरीत कामगारांची घरवापसी करण्यासाठी त्यांच्याकडून केवळ एक फेरीचा दर आकारला जावा. तर बसेसच्या परतीचा प्रवासाचा खर्च कामगार निधीतून भरला जावा. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने महाराष्ट्राच्या सीमा बंदच ठेवून तेथील कुणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाऊ नये. तसेच गोव्या कोरोनामुक्त झाला असल्याने तेथून येणाऱ्या स्थलांतरीतांची योग्य आरोग्य तपासणी करून त्यांना राज्यात येण्याची मुभा द्यावी, अशी सुचना मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
शनिवारी (ता. 2) मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील सुचना केल्या. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार सोमवारपासून (ता. 4) व्यवहार विभागनिहाय सुरळीत केले जावेत, अशी सुचना देखिल केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्थलांतरीतांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, स्थलांतरीतांना बस सुविधा उपलब्ध करून देताना यापूर्वी शासनाने प्रवासाचा दोन्ही खर्च स्तलांतरीत कामगारांनाकडून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याऐवजी केवळ जाण्याचा खर्च घेऊन परतीचा खर्च कामगार निधीतून भरून घेण्यासाठी शासनाने आदेश बजावावा, असे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बजावताना कामगारांकडून केवळ जाण्याचा खर्च घेण्याचे सांगितले.
बैठकीत जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी, केंद्र सरकारने विभागनिहाय मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली असून त्यानुसार जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने अशा ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत सुरु केले जाणार आहेत, अशी माहिती दिली. तर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, हिरेबागेवाडी गावचा मुद्दा उपस्थित करीत सीलडाऊनमुळे 4 हजार कुटुंब हलाखित जगत असून शासनाकडूनच जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, दोन महिने पुरेल इतका शिधा यापुर्वीच शासनाने दिला असून दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आणखी मदत त्याठिकाणी पोचविण्याचा सल्ला दिला. बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,विधानसभेचे उपसभापती आनंद मामानी, विधानसभेचे मुख्य सचेतक महंतेश कौजलागी, खासदार प्रभाकर कोरे, आमदार पी. राजीव, दुर्योधन ऐहोळे, अनिल बेणके, महजांतेश दोडगौड्र, महेश कुमठळ्ळी, महादेवप्पा यादवाड आदींसह जिल्हा पातळीवरील अधिकारी उपस्थित होते.
हिरेबागेवाडीतील रोहयो कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार
हिरेबागेवाडीमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून आल्याने कामगार विभागाशी चर्चा करून येथील प्रत्येक रोहयो कुटुंबाला 2 हजार रुपये बॅंक खात्यावर जमा करण्याची सुचना मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर यासंबंधी निर्णय घेताना 2 हजार ऐवजी तेवढ्याच किंमतीचे साहित्य देण्यावर देखिल चर्च्रा करावी, असे सुचविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.