प्रोत्साहन योजनेतून आतापर्यंत एक लाख ८८ हजार ५४६ शेतकऱ्यांना ६८६ कोटी ४१ लाख रुपये दिले आहेत. यामध्ये सरकारी नोकरी व इन्कमटॅक्स भरणारे असे ३३ हजार लाभार्थी अपात्र आहेत.
कुडित्रे : कर्जमाफीचा मुलाला लाभ दिला म्हणून आई-वडिलांचा लाभ मुलांना-वारसांना नाकारला आहे. यामुळे शेतकरी मुलांत असंतोष निर्माण झाला आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेतील (Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme) मृत शेतकऱ्यांच्या ८०० वारसांना लाभ प्रलंबित आहे.