Kolhapur News : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील तक्रारींसाठी २४ तास टोलफ्री क्रमांक; रुग्णांच्या आवाजाला मिळणार थेट न्याय
toll free Helpline : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, अनावश्यक शुल्क आणि विलंबाबाबत थेट तक्रार करण्यासाठी २४ तासांचा टोलफ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील अंमलबजावणी व उपचारांबाबतच्या तक्रारी समजून घेण्यासाठी २४ तासांचा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. यामुळे रुग्णांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.