कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमध्ये अस्फाल्ट पूर्ण, टर्फ बाकी

सप्टेंबरपर्यंत हॉकी स्टेडियम स्पर्धांसाठी सज्ज होण्याची शक्यता
Major Dhyanchand Hockey Stadium
Major Dhyanchand Hockey Stadiumsakal

कोल्हापूर : ​मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमध्ये रोलिंग, बेडिंगनंतर पहिल्या अस्फाल्ट लेयरचे काम पूर्ण झाले असून, मार्चअखेर टर्फ मैदानावर बसण्याची शक्यता आहे. या वेगाने काम पूर्ण झाल्यास सप्टेंबरअखेर हे मैदान स्पर्धेसाठी उपलब्ध होणार आहे. ड्रेन, लाईन, रोलिंग, बेडिंगचे चार लेयर, फोर साईड ड्रॉप वॉटर लेव्हल पूर्ण होऊन चार इंच हून अधिक जाडीचे अस्फाल्ट मिक्सर लेयर पूर्ण केले आहे. यानंतर आणखी दोन लेयर देण्यात येणार असून, यानंतर रबर लेयर आणि शेवटी टर्फ बसवण्यात येणार आहे. मार्च २०२२ अखेर हे काम पूर्ण होण्याचा अंदाज विकासकांनी व्यक्त केला आहे. तसेच हे मैदान भोवतालीची अन्य कामे पूर्ण करून २०२२ सप्टेंबरअखेर स्पर्धांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.

Major Dhyanchand Hockey Stadium
कोरोनामुक्‍तीनंतर मृत्यू झालेल्यांनाही 50 हजारांची मदत! ऑफलाइन अर्ज करता येईल

फोर वे डाऊन ड्रेनेज सिस्टममुळे कितीही मोठा पाऊस झाल्यास अवघ्या काही तासांमध्ये खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी मैदान उपलब्ध होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आल्याने जिल्ह्यातील हॉकी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले मैदान उपलब्ध होणार असून, विभागीय आणि राज्य स्पर्धा खेळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

होस्टेल, गाळे दुसऱ्या टप्प्यात

मैदानाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या जागेमध्ये व्यावसायिक वापरासाठी दुकान गाळे निर्माण करण्यात येणार आहेत, तर मैदान बंदिस्त करून खेळाडू व्यतिरिक्त मैदानावर येणाऱ्यांना रोखण्यात येणार आहे. मोठ्या स्पर्धांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून होस्टेलची निर्मिती करण्याचे प्रयत्न दुसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.

"कोल्हापूरच्या हॉकी परंपरेला खूप मोठा इतिहास आहे. खेलो इंडिया व कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम पूर्णत्वास येत असल्यामुळे कोल्हापूर राज्यातील नव्हे, तर देशपातळीवरील प्रमुख केंद्र बनेल."

-मोहन भांडवले, सेक्रेटरी, दि हॉकी कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com