आजरा : गव्यांच्या झुंजीत नर गव्याचा मृत्यू

गव्यांच्या लागलेल्या झुंजीमध्ये नर गव्याचा मृत्यू झाला आहे. आजरा गडहिंग्लज मार्गावर वनविभागाच्या सुलगाव रोपवाटिके जवळील जंगलात पहाटे चारच्या सुमाराला ही घटना घडली.
Male Indian Bison
Male Indian BisonSakal
Updated on: 
Summary

गव्यांच्या लागलेल्या झुंजीमध्ये नर गव्याचा मृत्यू झाला आहे. आजरा गडहिंग्लज मार्गावर वनविभागाच्या सुलगाव रोपवाटिके जवळील जंगलात पहाटे चारच्या सुमाराला ही घटना घडली.

आजरा - गव्यांच्या (Indian Bison) लागलेल्या झुंजीमध्ये (FIghting) नर गव्याचा मृत्यू (Death) झाला आहे. आजरा गडहिंग्लज मार्गावर वनविभागाच्या सुलगाव रोपवाटिके जवळील जंगलात पहाटे चारच्या सुमाराला ही घटना घडली. आज सकाळी गव्याचा मृतदेह आढळला. याच ठिकाणी मातीमध्ये गव्यांनी झुंज केल्याच्या खुणा मातीमधे दिसल्या. आहेत. त्यामुळे गव्याचा झुंजीमध्ये मृत्यू झाल्याचा वनविभागाकडून दुजोरा मिळाला आहे. दुपारी या गव्याचे सुलगाव रोपवाटिकेत दफन करण्यात आले.

Male Indian Bison
मोदींच्या वक्तव्यावर भिडे गुरुजी म्हणतात, 'दोघांनीही लोकांना...'

आज पहाटे आजरा गडहिंग्लज मार्गावर वनविभागाच्या सुलगाव रोपवाटिके नजीक गवा म़ृतावस्थेत आढळला. त्याला पहाण्यासाठी वहानधारकांची मोठी गर्दी झाली होती. जवळच जमिनीवर मातीत गव्यांच्या पाऊल खुणा मोठ्या प्रमाणात उमटल्या होत्या. त्यामुळे या कळपात गव्यांची झुंज झाल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगीतले. त्यामुळे दम लागून गव्याचा मृत्यू झाला असावा असेही सांगण्यात आले. आजऱ्याचे पशुधन विस्तार अधिकारी पी. डी. ढेकळे यांनी शवविच्छेदन केले. त्यांनी सांगीतले सदरचा गवा हा नर असून तो सात वर्षांचा आहे. तो आजारी होता. त्याच्या शरीरात न्युमोनियाची लक्षणे आढळली आहेत.त्यामुळे कळपात झुंज सुरु झाल्यावर थकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. येथील सुलगाव रोपवाटिकेमध्ये गव्याचे दफन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com