esakal | सेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार: कार्यकर्त्यांनो कामाला लागा; माजी आमदाराचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

'सेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार: कार्यकर्त्यांनो कामाला लागा'

नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात नरहर मंदिरात सेना-राष्ट्रवादी आघाडीची बैठक झाली.

'सेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार: कार्यकर्त्यांनो कामाला लागा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (कोल्हापूर) : आघाड्या आणि युतीबाबत राज्यात काय होणार माहीत नाही; पण मलकापूर नगरपालिकेसाठी (Malkapur municipal corporation)शिवसेना-राष्ट्रवादीची (NCP Shiv Sena)आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करत सत्ता पालिकेत आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार सत्यजित पाटील (Satejeet Patil) यांनी केले.

नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात नरहर मंदिरात सेना-राष्ट्रवादी आघाडीची बैठक झाली. त्यावेळी माजी आमदार पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंग गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

ते म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे नगरपालिका म्हणजे कंत्राटदारांचे दालन झाले आहे. मलकापूरला बदनाम करण्याचे काम काहीजण करत आहेत. सर्वसामान्यांना महत्त्‍व नाही. हे चित्र बदलून खऱ्याखुऱ्या विकासातून सर्वसामान्य जनतेची नगरपालिका अशी प्रतिमा तयार करण्यासाठी सेना-राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा.’’

मानसिंग गायकवाड म्हणाले, ‘‘राज्यात सेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे हवा तितका फंड आणू. त्यासाठी पालिकेत आघाडीची एकहाती सत्ता द्या. यावेळी आम्ही सर्व तयारीने आहोत. त्यामुळे जिल्हा बँकेसह सगळे गुलाल आपलेच असतील.’’

आघाडी प्रमुख प्रकाश पाटील म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी जनतेने आम्हाला सत्ता दिली होती. यावेळी १७ पैकी १२ हून अधिक सदस्य निवडून आणून सत्ता घेऊ. ज्यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे, त्यांनी कामाला लागा.’’ माजी नगराध्यक्ष राजू भोपळे, प्रवीण बेर्डे, किरण घोटणे, दस्तगीर अत्तार, सेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेवगिरी, तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, नगरसेवक सुहास पाटील, सुभाष कोळेकर, विनायक कुंभार, माया पाटील, शालन सोनावळे, संगीता कुंभार, बाबूराव ओतारी, बाबूराव चांदणे आदींसह आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top