
Man Attacks Woman Over Message : महिलेला मोबाईलवरून मेसेज केल्याच्या रागातून आदिनाथ कृष्णात कोईंगडे (वय ३०, रा. शिंगणापूर, करवीर) याचे अपहरण करून अज्ञातस्थळी बेदम मारहाण करण्यात आली. काठी, सळई, पट्ट्याने केलेल्या मारहाणीत कोईंगडेच्या चेहऱ्यावर, डोक्यात, पाठीवर, पायावरील रक्त गोठल्याचे दिसून आले. याप्रकरणी करवीर पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली.