
Revenge Crime Sangli : उटगी येथे तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास टाकण्यात आलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात एलसीबीच्या पथकास यश आले आहे. दरोडेखोरांनी दहा लाखांचा ऐवज लुटताना दोघा सख्ख्या भावांना बेदम मारहाण केली होती. हा दरोडा टाकण्यासाठी एका सराईत गुन्हेगारास सुपारी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तिराईत पण परिचित महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधास विरोध केल्याचा बदला म्हणून दरोडा टाकण्यासाठी सुपारी देणाऱ्यालाही पोलिसांनी जेरबंद केले असल्याची माहिती निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.