
Loudspeaker Rules Kolhapur : ‘आवाज सोडतो, काचा फोडतो’....असे फलक हातात घेत गणेश आगमन मिरवणुकीत थेट पोलिस प्रशासनाला आव्हान देण्याचे प्रकार घडले. राजारामपुरीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या या फलकांची पोलिस अधीक्षकांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. राजारामपुरी पोलिसांनी गणेश तरुण मंडळाचा अध्यक्ष सोहन प्रताप पाटील (राजारामपुरी १२ वी गल्ली) याला उचलून आणले. आपल्या कृत्याबद्दल माफी मागणारा त्याचा एक व्हिडिओही बनविण्यात आला असून, तो व्हायरल करत पोलिसांनी अध्यक्षाचा माज उतरवला.