मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमासाठी २५ हजार नागरिक येणार - माजी आमदार काकासाहेब पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kakasaheb Patil

मानव बंधुत्व वेदिकेतर्फेनिपाणीत रविवारी महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम होणार आहे.

मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमासाठी २५ हजार नागरिक येणार - माजी आमदार काकासाहेब पाटील

निपाणी - मानव बंधुत्व वेदिकेतर्फेनिपाणीत रविवारी (ता.६) छत्रपती शिवाजी महाराज, महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, गाडगेबाबा महाराज, यांच्यासह महापुरुषांच्या विचारांचा जागर या कार्यक्रम होणार आहे. कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मानव बंधुत्व वेदिके या संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रमम्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून २५ हजार जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी निपाणी मतदारसंघात गावोगावी तसेच शहरी भागात प्रत्येक प्रभागात जागृती करण्यात आल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली.

शुक्रवारी(ता४) म्युनिसिपल हायस्कूल मैदानावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, मानव बंधुत्व वेदिकेच्या कार्यक्रमासाठी चिकोडी जिल्हा व्याप्तीतील सर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अथणी, रायबाग, कुडची, कागवाड या मतदारसंघांतील नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था व जेवणाची व्यवस्था चिकोडी रोडवरील समाधी मठासमोरील एपीएमसीच्या जागेत करण्यात आली आहे. हुक्केरी व यमकनमर्डी मतदारसंघांतील नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ईदगाह मैदान व जेवण व्यवस्था स्तवनिधी येथील ब्रह्मनाथ भवनात केली आहे. निपाणी व चिकोडी मतदारसंघांतील नागरिकांच्या वाहनांची व्यवस्था अकोल क्रॉस जवळील आंबा मार्केट येथे तर जेवणाची व्यवस्था कार्यक्रमस्थळाच्या पाठीमागील बाजूस केल्या सांगितले.

चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, अंधश्रद्धेत गुरफटलेल्या बहुजन समाजाला वैचारिक सिद्धांताद्वारे जागृत करण्यासाठी तसेच मानव कल्याणासाठी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर यासारख्या महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास म्हैसूर येथील ज्ञानप्रकाश स्वामीजी, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या प्रा.सुषमा अंधारे, हेब्बाळ येथील बसवचेतन स्वामीव चैतन्य महाराज वाडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमस्थळी स्वतंत्र प्रकाश व्यवस्था, आवाज आणि स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, युवा नेते रोहन साळवे, किरणसिंग रजपूत, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, निकु पाटील, माजी सभापती किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, बबन घाटगे,प्रशांत नाईक, युवराज पोळ, श्रीनिवास संकपाळ, अशोक लाखे, सचिन लोकरे,अशोक खांडेकर, अस्लम शिकलगार, नवनाथ चव्हाण, सुधाकर सोनकर,बाळू कमते, सुनिल लाटकर, शशी पाटील, बबन चौगुले, मज्जिद सय्यद, सिताराम पाटील, यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :EventNipani