
Kolhapur Agriculture Department : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक (फार्मर आयडी) अनिवार्य केली आहे. एकीकडे एक लाख शेतकऱ्यांची फार्मर आयडी प्रलंबित आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे वारस नाव लागले असताना व नवी न खातेदार शेतकऱ्यांची नावे ऑनलाईनला दिसून येत नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांचा लाईव्ह अपडेट डाटा अपलोड नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना तलाठी, तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.