"आजवर केवळ आश्वासनांची बोळवण करत मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे. यापुढे आम्ही हा प्रकार सहन करणार नाही. तीव्र संघर्षाची पावले टाकण्याची आमची तयारी आहे."
कोल्हापूर : ‘मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठा परिषद घेऊन मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) अन्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा, दहा मार्चनंतर राज्यभरात मराठा बांधव तीव्र आंदोलन छेडतील’, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे (Maratha Aarakshan Sangharsh Samiti) अध्यक्ष सुरेश पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.