"सावंत यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, म्हणून मुख्यमंत्र्यांना ई-मेल करण्यात आला आहे. संबंधितावर कारवाईसाठी राज्यभर सकल मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू करण्यात येत आहे."
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (History Researcher Indrajit Sawant) यांना धमकी देणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी शब्दांत उल्लेख करून अवमान करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्यावर सरकारने कारवाई करावी; अन्यथा त्याला कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा सकल मराठा समाज (Maratha Community) व शिवप्रेमींच्या वतीने हर्षल सुर्वे व वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिला.