मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात काळ्या फिती लावून आंदोलन

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात काळ्या फिती लावून आंदोलन

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाजासाठी राज्याचे दोन दिवसाचे अधिवेशन घ्यावे. अशी मागणी मराठा समाजाचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत. आज सकाळपासूनच कोल्हापुरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकात(Chhatrapati Shivaji Chowk) काळ्या फिती आणि काळे कपडे घालून हे आंदोलन करण्यात येत आहे.(Maratha-reservation-agitation-at-Shivaji-Chowk-kolhapur-news)

मराठा आरक्षणावर निर्णयासाठी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, निर्णय होईपर्यंत समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, ज्या नियुक्ती रखडल्या आहेत अशांना तातडीने नियुक्ती पत्रे द्यावीत, ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजातील विद्याथ्यार्ना सवलती द्याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com