Maratha Reservation : 'आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा'; मराठा समाज आक्रमक

expel Bhujbal who oppose reservation from the cabinet'; Maratha community aggressive!
Maratha Reservation Chhagan Bhujbal
Maratha Reservation Chhagan Bhujbalesakal
Summary

सकल मराठा समाजाकडून आज दुपारी बारा वाजता दसरा चौकात भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येणार आहे.

कोल्हापूर : मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय सर्व मंत्र्यांना बंधनकारक असतो. तरीदेखील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध केला आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली.

सकल मराठा समाजाकडून बुधवारी (ता. ८) दुपारी बारा वाजता दसरा चौकात भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली जाणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आणि जरांगे- पाटील यांच्याबद्दल अवमान करणारे विधान केले. या विधानाचा निषेध सकल मराठा समाजाने आज केला.

Maratha Reservation Chhagan Bhujbal
कर्नाटकच्या राजकारणातील मोठी बातमी! शिवकुमार-जारकीहोळींची गुप्त बैठक; चर्चेनंतर DK थेट दिल्लीला रवाना, काय घडणार?

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, ‘जरांगे -पाटील हे आता सर्वसामान्य कार्यकर्ते राहिले नाहीत. ते मराठा समाजाचे नेते आहेत. न्यायमूर्तींनी त्यांचा उल्लेख ‘सर ’असा केला तर भुजबळांना वाईट वाटण्यासारखे काय आहे? मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांना बंधनकारक असताना त्यांनी आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. यातूनच मराठा समाजाबद्दल त्यांच्या मनात राग आहे हे दिसून येते. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.’

प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई म्हणाले, ‘सामान्य राजकीय कार्यकर्त्यांनी असे विधान केले तर समजून घेता येईल. मात्र सर्व जाती-धर्मांचा सन्मान करण्याची शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून अशी विधाने होणे चुकीचे आहे.’ यावेळी बाबा पार्टे, ॲड. बाबा इंदुलकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Maratha Reservation Chhagan Bhujbal
Raju Shetti : शेतकऱ्यांची दिवाळी होणार नसेल, तर कारखानदारांचीही होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा रोखठोक इशारा

विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मागणीला विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांनी आंदोलस्थळी येऊन पाठिंबा दिला. जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना, कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असो., भारत राष्ट्र समिती, राजारामपुरी तालीम मंडळ, बजापराव तालीम मंडळ यांच्यासह कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ यांनी जाहीर पाठींबा दिला. तसेच माजी आमदार सुरेश साळोखे, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, सुंदरराव देसाई, अमोल सरनाईक, मंदार वैद्य, प्रदीप नंदीवाले, भीमराव पाटील-सरुडकर, संग्राम जाधव, विक्रमसिंह जरग, दिव्या मगदूम, गीतांजली पाटील, सुभाष पाटील, सूर्यकांत मांडवकर, अशोक चौगुले, रमेश भुर्टे, रविंद्र पुराणिक, सुभाष मुदगल, विशाल जाधव, विजय टोपकर, आनंदराव माजगांवकर, उमाकांत कातवरे,मेजर हरी पाटील यांनी आंदोलकांना प्रत्यक्ष भेटून पाठींबा व्यक्त केला.

Maratha Reservation Chhagan Bhujbal
Maratha Reservation : OBC मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांना स्वतंत्र..; काय म्हणाले रामदास कदम?

भुजबळांची स्क्रिप्ट भाजपची

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘छगन भुजबळ म्हणजे भाजपच्या हातातील खेळणे आहे. ईडीची भीती दाखवून भाजप भुजबळांकडून अशी वक्तव्ये करून घेत आहे. भुजबळांची स्क्रिप्ट भाजपची आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com