esakal | कोल्हापूर Live:जे घडले ते विसरून पुढील दिशा ठरवायची आहे;सतेज पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

 जे घडले ते विसरून पुढील दिशा ठरवायची आहे;सतेज पाटील

जे घडले ते विसरून पुढील दिशा ठरवायची आहे;सतेज पाटील

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर: ''एक मराठा लाख मराठा'' म्हणत पुन्हा एकदा एल्गार पुकारून आंदोलनाची सुरूवात झालेली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शाहू समाधीस्थळी हा परीसर भगवामय झाला आहे. आंदोलनस्थळी मान्यवरांनी गवतावर बैठक मारली आहे. आंदोलकांन बरोबर सर्वपक्षीय नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. मराठा समाजाला दिशा देण्यासाठी हे आदोलन सुरु आहे. लोकप्रतींनीधि संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. maratha-reservation-silent-agitation-live-update-in-kolhapur

या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्‍थित राहिले आहेत. राजर्षी शाहू महाराज, प्रकाश आंबेडकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा.संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर या बैठकीस उपस्‍थित आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही काळ आंदोलनस्‍थळी उपस्‍थिती लावली.

न्यालालयासमोर आपली बाजू व्यवस्थित मांडणं महत्वाचे- खासदार धैर्यशील माने

केंद्र,राज्य सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत तसेच केंद्र,राज्य सरकारने एकमेंकाकडे बोट दाखवू नये-प्रकाश आवाडे

सामान्य कार्यकर्ते म्हणून आम्ही आंदोलनात सहभागी आहोत. संभाजीराजेंनी आंदोलनात नेमकेपणा आणला- -खासदार संजय मंडलिक

केंद्रामध्ये सर्व 48 खासदारांनी भूमिका मांडावी ;आमदार-राजेंद्र पाटील- यड्रावकर

दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकलं नाही.जे घडले ते विसरून पुढील दिशा ठरवायची आहे-पालकमंत्री सतेज पाटील

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आंदोलनस्थळी दाखल.

समतेची भूमी आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात,गरीबांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचं

मराठा शिक्षण :ग्रामविकास मंत्री

loading image