महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन शिक्षण समूहात (Sant Gajanan Education Group) आयोजित ‘एक्सप्लोर २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
महागाव : ‘आपण मोठ्या शहरांपासून लांब आहोत, असा न्यूनगंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बाळगू नये. कारण मी सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेली आहे. जेवढे आपण मातीशी जोडलेले असतो, तेवढे जास्त खंबीर, चिवट, जिद्दी असतो. त्यामुळे ‘तुम्ही ठरवलंत तर जग जिंकू शकता’,’ असा आत्मविश्वास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi actress Prajakta Mali) हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला.