

बेळगाव - ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी काही जणांनी आतापासुनच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी बेळगाव तालुक्यातुन मराठी उमेदवार देण्यासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने विखुरलेले मराठी भाषिक एकत्रीत येण्याची संधी निर्माण झाली असुन आता वरीष्ठ नेत्यांनी ही संधी न दडवता मराठी उमेदवाराचा विजय निश्चीत करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
सीमाभागात बेळगाव व खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या दोन्ही तालुक्यात सहकाराचे झाळे विनले असुन प्रत्येक गावात एक सहकारी संस्था आहे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. बेळगाव तालुक्यात कृषी पत्तीन संघ व इतर सहकारी संस्थाची संख्या मोठ्या प्रमाणात असुन यापैकी सर्रास संस्थावर मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी बेळगाव तालुक्यातील 88 संस्था पात्र आहेत यापैकी 60 टक्के संस्थावर मराठी भाषिकांचे पुर्ण वर्चस्व आहे. तर इतर संघ संस्थामध्येही कमी जास्त प्रमाणात मराठी भाषिक संचालक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मराठी भाषिक उमेदवार सहजरित्या निवडुन येऊ शकतो मात्र मराठी मतदारांचे वर्चस्व असुन देखिल आतापर्यंत ही निवडणुक लढविण्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परंतु खानापूर तालुक्यात माजी आमदार अरविंद पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर दोन वेळा निवडुन येत मराठी भाषिक उमेदवार ही निवडणुक जिंकु शकतो हे दाखवुन दिले आहे. त्यामुळेच बेळगाव तालुक्यातुनही उमेदवार द्यावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासुन होत आहे.
जिल्हा बॅंकेत मराठी उमेदवार निवडुन आला तर तालुक्यातील कृषी पत्तीन संस्था व इतर संस्थाना आपली पत भक्कम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मराठी उमेदवार विजयी करण्यासाठी मराठी भाषिक नेत्यांनी आतापासुनच मोर्चे बांधणी करणे आवश्यक आहे. तालुक्यातील अनेक संघ संस्थावर मराठीचे प्राबल्य आहे. त्यामुळे ही संधी दवडु नये अशा प्रतिक्रीया मराठी भाषिक कृषी पत्तीन संस्थाच्या संचालकांमधुन व्यक्त होत आहेत.
बेळगाव तालुक्यातील सहकारी संघ संस्थावर मराठी भाषिकांचे सुरुवाती पासुनच वर्चस्व आहे. मात्र आता पर्यंत या निवडणुकीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर मराठी भाषिक निवडुन गेला नाही मात्र यावेळी मराठी उमेदवार देणे गरजेचे आहे. यामुळे मराठी भाषिकांना बळ मिळेल.
सुनिल अष्टेकर, तालुका पंचायत सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.