कोल्हापूर मार्केट यार्डात ये-जा केलेल्यांची सक्तीची स्वॅब तपासणी

एकाच वेळी पाचशेहून अधिक गाड्या आतमध्ये अडकल्या
कोल्हापूर मार्केट यार्डात ये-जा केलेल्यांची सक्तीची स्वॅब तपासणी

कोल्हापूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेली सात दिवस सुरू असलेला कडक लॉकडाऊन (kolhapur lockdown) शिथिल झाला. आज कोल्हापूर शाहू मार्केट यार्डत (shahu market yard) घाऊक शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाले. ही संधी साधून महापालिका प्रशासन (munciple corporation) व बाजार समितीने मार्केट यार्डचे सर्व फाटक बंद केले. परिणामी एकाच वेळी पाचशेहून अधिक गाड्या आतमध्ये अडकल्या. सोबतच कित्येक लोक अडकले होते. यासर्वांची जबरदस्तीने स्वॅब तपासणी (swab testing) करण्यात आली. त्यामुळे जे किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी बाजार पेठेत गेले होते तेही अडकले. शिवाय काहीजण बाहेर पडण्यासाठी पळवाटा शोधत मार्केट यार्ड परिसरात फिरत राहीले.

कोणतीही पूर्वसूचना न देताच मार्केट यार्ड आवारात आलेल्यांची जबरदस्ती स्वॅब तपासणी सुरु सुरू केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शाहू मार्केट यार्डात मिनी भाजीपाला बाजार आणि फळ बाजार आहे. तसेच आंब्यांची आवक सुरु आहे. त्यामुळे अनेकजण किरकोळ खरेदीसाठी आज पिशव्या घेऊन बाजारपेठेत आले होते. त्यापैकी काहीजण सकाळी नऊच्या अगोदरच यार्डाबाहेर पडले ते सुटले. मात्र नऊ ते अकरा या वेळेत जे भाजीपाला खरेदीसाठी आले ते सर्वजण मार्केट आवारातच अडकले. बाहेरगावावरून आलेला शेतीमाल मोठ्या गाड्यांतून आला आहे. हा माल बाहेरच्या जिल्ह्यातून आला असल्याने त्या संबधित वाहनधारकांची स्वॅब तपासणी ठीक मानली आहे पण स्थानिक नागरिक बाजारपेठेत सात दिवसानंतर भाजीपाला खरेदीसाठी आलेल्यानाही अडवून ठेवले.

कोल्हापूर मार्केट यार्डात ये-जा केलेल्यांची सक्तीची स्वॅब तपासणी
कोल्हापुरात लॉकडाऊन शिथिल; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

अनेक जण स्वॅब तपासणी देण्याविषयी हरकत नव्हती. मात्र पूर्वसूचना दिली असती तर गर्दीत अडकण्याची आणि वेळ वाया जाण्याची गैरसोय टाळता आली असती. त्यामुळे मार्केट यार्डाच्या पश्चिम फाटकावर सकाळपासून सुरक्षारक्षकांसोबत लोकांची वादावादी सुरू होती. दरम्यान घाऊक व किरकोळ शेतीमाल खरेदी विक्री व्यवहारासाठी आलेल्या सर्वांच्या गाड्या अडवून ठेवल्याने अनेकांची कोंडी झाली. मोठ्या संख्येने दुचाकीस्वारही बाजार समितीच्या आवारात अडकले. यात अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही सोडलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com