
Kolhapur : आजऱ्यापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या बुरुडे (ता. आजरा) येथील भावेश्वरी कॉलनीत राहणाऱ्या नवदांपत्याचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. बाथरूममधील गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता आहे. आज सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीस आली. सागर सुरेश करमळकर (वय ३३), सुषमा सागर करमळकर ऊर्फ सुषमा मुरकुंबी (२४) असे नवदांपत्याचे नाव आहे. त्यांचा विवाह होऊन महिनाही उलटला नव्हता. या घटनेमुळे आजरा पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.