
कोल्हापूर : वधू-वर सूचक नोंदणी संकेतस्थळावर जाऊन महिला, तरुणींचे प्रोफाईल चेक करणे, त्यानंतर त्यातील सुंदर महिलेला फेसबुकवरून आकर्षक फोटोची फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे, त्यांचा रिप्लाय आला की, त्यांच्याशी मैत्री करणे, पुढे संपर्क वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणे व त्यांच्याकडून पैसे उकळणे, असे कारनामे पुण्याचा भामटा फिरोज शेखने केले आहेत. स्वत: विवाहित असूनही अशा पद्धतीने महिला, तरुणींच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या फिरोजची विकृती या निमित्ताने समोर आली, तर फ्रेंड रिक्वेस्टला भाळून संबंधित पीडितांनी स्वत:च्या आयुष्याचे नुकसान करून घेतले.