
कोल्हापूर : प्रस्तावित २० गावांमध्ये कडकडीत बंद पाळून हद्दवाढीमधील विरोध करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी दवाखाने, दूध संस्था अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी समितीतर्फे करण्यात आला. दरम्यान, सरकारने एकतर्फी निर्णय लादल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.