पन्हाळा तालुक्‍याचे गणित "डाऊन' 

Mathematics of Panhala taluka "down"
Mathematics of Panhala taluka "down"

पन्हाळा  ः पन्हाळगडी रविवारपासून बीएसएनएलचा सर्व्हर नसल्याने आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. सर्व्हरचा मोठा फटका दुय्यम निबंधक कार्यालयास बसला असून एकाच कामासाठी पक्षकारांना हेलपाटे मारत आहेत. वेळेत दस्त न झाल्याने व्यवहार फिसकटत आहेत. साहजिकच पक्षकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. सर्व्हरमुळे तालुक्‍याचेच आर्थिक गणित विस्कळित झाले आहे. दरम्यान, गेले चार दिवस 60 वर दस्त नोंदणी प्रलंबित आहे.

गावोगावी रस्त्याचे काम सुरू असल्याने उकरताना जेसीबीमुळे बीएसएनएलची केबल तुटत आहे. तुटलेल्या केबलचा ठावठिकाणा मशीनशिवाय लागत नाही. त्यात पन्हाळगडी बीएसएनएलचा टॉवर आहे; पण इथे एकही कर्मचारी नसल्याने तक्रार झाल्यानंतर कोल्हापूर येथून कर्मचारी आपल्या वेळेनुसार येतात नि दुरुस्ती करतात. त्यांचे काम होईपर्यंत दुसरीकडे केबल तुटलेली असते. अर्थात त्यांचे सोयरसुतक कर्मचाऱ्यांना नसते; पण तीस ते चाळीस किलोमीटरवरून आलेल्या पक्षकारांना असते. दस्ताबरोबर आलेल्या आठ ते दहा लोकांचे गाडीभाडे, त्यांचे चहापान करताना तोंडाला फेस येतो आणि दुसऱ्या दिवशी परत येतो की नाही याची धाकधूक असते. शासनाला मुद्रांकाच्या रूपाने पैसे द्यायचे ते द्यायचे; पण वेळेत कामही होत नसल्याने लोकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

रविवारपासून सर्व्हर नसल्याने आणि आज सोमवार पेठेत केबल तुटली आहे. तर उद्या सातवेत अगर कोडोली येथे तुटली आहे, दुरुस्ती चालू आहे, तासा दोन तासांत काम होईल हे ऐकून ऐकून लोक कंटाळले आहेत. सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. लोक जमिनीचा तुकडा विकून अगर बॅंकेचे कर्ज काढून मुलामुलींचे हात पिवळे करण्यासाठी तळमळत आहेत; पण व्यवहारांची नोंदणीच होत नसल्याने त्यांची गोची होते आहे. 

रविवारपासून केबल तुटली आहे, हे खरे आहे, काल सोमवार पेठेत केबल तुटली होती. आज सातवेत तीन चार ठिकाणी तुटली आहे. मार्च चालू असल्याने रस्त्यांची कामे चालू आहेत. जेसीबीमुळे केबल तुटते तर काही ठिकाणी उंदीर केबल कुरतडतात. पन्हाळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन संजीवनकडून आणि वारणेकडून केबल दुरुस्ती चा प्रयत्न चालू आहे. 
सुखदेव भालके, उपमंडळ अभियंता, बीएसएनएल 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com