

Municipal councillor signature rule Maharashtra
esakal
Maharashtra Municipal Mayor Rules : महापालिकेतील गटांची नोंदणी करण्यासाठी पक्षप्रमुखांसह गटातील नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांसमोर उपस्थित राहून सही करावी लागणार आहे. त्यामुळे गटांची स्थापना जरी झाली तरी विभागीय आयुक्तांनी कळवल्या जाणाऱ्या तारखेला संबंधित नगरसेवकांना पुण्यात उपस्थित राहावे लागणार आहे. त्यानंतरच महापौर निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत. ३० जानेवारीला महापौर निवडीची सभा घेण्याचा प्रयत्न आहे.