
"दुसऱ्यांचे वाईट चिंतणाऱ्यांचे वाईट होते आणि चांगल्या माणसाला कधीही चांगलेच फळ मिळते, याचे उदाहरण या निवडणुकीने दाखवून दिले आहे."
गडहिंग्लज : ‘मला व माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात टाकून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना परमेश्वरानेच अद्दल घडविली आहे. ज्या पक्षात राहून त्यांनी हे वाईट काम केले, त्या पक्षासोबतच्या सत्तेत मी आज मंत्री आहे. मात्र, त्यावेळी मी जेथे होतो, त्या पक्षात ते आज आहेत. दुसऱ्यांचे वाईट चिंतणाऱ्यांचे वाईट होते आणि चांगल्या माणसाला कधीही चांगलेच फळ मिळते, याचे उदाहरण या निवडणुकीने दाखवून दिले आहे’, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी समरजितसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांचे नाव न घेता हाणला.